आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जानेवारी २०२२ मध्ये शेतात सामूहिक अत्याचार झाला होता. याप्रकरणी यावल पोलिसात पोस्कोसह विविध कलमान्वये अल्पवयीनासह तीन जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी जळगाव विशेष बाल न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी विशेष दक्षता घेत यावल न्यायालयातून व्हीसीद्वारे पीडीतेची साक्ष जिल्हा न्यायधीशांनी नोंदवली.
अल्पवयीन पीडीतेस जिल्हा न्यायालयात न नेता स्थानिक न्यायालयात साक्ष घेण्यात आली. २६ जानेवारी २०२२ रोजी ही घटना घडली होती. तीन संशयीतांनी अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून शेतात, सामूहिक अत्याचार केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर पीडीतेने काकाकडे वाच्यता केली. त्यानंतर मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला होता. तपासात या गुन्ह्यातील दोन संशयीत हे अल्पवयीन होते तर सतीश प्रभाकर धनगर (रा. सांगवी खुर्द) यांच्या मदतीने सदर कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले होते.
पीडीतेसोबत रक्ताच्या नातेवाईकांनाच हजर राहण्याची मुभा पीडीतेचे मनोधैर्य खचू नये, तिला साक्ष नोंदवण्यासाठी जिल्हा न्यायालयात येण्याचा त्रास होऊ नये म्हणून, विशेष बाल न्यायालयाने यावल न्यायालयात विशेष कक्षात व्हीसीची व्यवस्था करून साक्ष नोंदवली. या कक्षात पीडीतेसोबत केवळ रक्ताच्या नातेवाइकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती. सर्व प्रक्रियेत केवळ पीडीत मुलगी आणि विशेष न्यायधीश यांच्यातच संवाद झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.