आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीची सत्ता उलथवून एकनाथ शिंदे यांचे सरकार अस्तित्वात आले. त्या घटनेस सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, वीज महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांना दरमहा दिल्या जाणाऱ्या मासिक वीज बिलावर अद्यापही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्रासह नावाचा उल्लेख आढळन येतो. यामुळे ग्राहकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे शिंदे सरकारमध्ये ऊर्जामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असताना वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणा चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या घटनेला आता सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र या बदलाचा थांगपत्ता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना नसल्याचे दिसून येते.
दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा महावितरण कंपनीने मविआ सरकार बदलल्यानंतर वीज बिलावरील ठाकरे सरकारची जाहिरात त्वरित हटवणे क्रमप्राप्त होते. मात्र, अद्यापही ही जाहिरात कायम आहे. यात निष्काळजीपणा करणाऱ्या महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी वरिष्ठांना कळवू. पद्माकर महाजन, उपाध्यक्ष, जिल्हा भाजप, रावेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.