आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:गळती लागल्याने टँकरमधील अॅसिड अंगावर उडून कंडारीतील चौघे जखमी; वेळीच सतर्कतेमुळे अनर्थ टळला

बोदवड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोदवड येथे ११ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पाटील पेट्रोल पंपासमोर बोदवड ते मलकापूर रोडवर ॲसिड सारख्या ज्वालाग्राही पदार्थाने भरलेलेल्या टँकरला गळती लागली. हा ज्वालाग्रही पदार्थ अंगावर उडून कंडारी (ता.भुसावळ) येथील दुचाकीवरील पती, पत्नीसह दोन मुले जखमी जाले.

फिर्यादी सुरेश सोनवणे (वय ३९,रा.कंडारी) हे पत्नी व दोन मुलांसह मलकापूर येथून येऊन भुसावळकडे जात होते. बोदवड येथे सार्वजनिक रस्त्यावर टँकर लिकेज झाल्यामुळे सोनवणे, त्यांची पत्नी व मुलांच्या अंगावरील अॅसिडचे फवारे उडाले. त्यात त्यांचे कपडे जळून तसेच अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या. सुरेश सोनवणे व त्यांची पत्नी मनीषा सोनवणे, मुलगी अनुष्का सोनवणे (वय १०), मुलगा अरुष सोनवणे (८ वर्षे) हे सर्व जखमी झाले. या प्रकरणातील टँकर (क्रमांक जीजे.१६-एव्ही.१७२१) चालक आरोपी शुभम रामचंद्र शेळके (रा.महाळुंगी जागीर, जि.बुलडाणा) याच्याविरूद्ध बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, बाजूलाच असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने असिडच्या टँकरला गळती लागलेल्या ठिकाणी गोधडी टाकल्याने पुढील संभाव्य धोका व जीवित हानी टळली. त्यानंतर गळती झालेल्या टँकरमधून अॅसिड दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आले. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...