आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृग नक्षत्र:8 तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात; वाकोद परिसरात शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आभाळाकडे

वाकोद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृग नक्षत्रात दरवर्षी पेरणी केल्या जाते. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरुवात झाली असूनही अद्याप पेरणीयोग्य पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची कोणतीही चाहूल दिसत नसल्याने आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळांमुळे शेतकऱ्यांच्या शेती कामाचा खोळंबा होत असून काम करणे त्रासदायक ठरत आहे. तर पाऊस लांबणीवर गेल्यास खरीप हंगामाच्या तयारीचा वेग मंदावणार आहे.

पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरी देखील अद्याप वाकोद परिसरात व जामनेर तालुक्यातील शिवारात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी-करिता विविध प्रकारच्या बियाण्यांचे वाण उपलब्ध करून ठेवले आहे. तर काहींची तडजोड सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...