आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावसभाऊ निघाला पती:नवरीचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशी पळ, कथित मावसभाऊ तरुण निघाला पती

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक लाख रुपये देऊन शहापूर (मध्य प्रदेश) येथील तरुणाने कंडारी (ता.भुसावळ) एका युवतीसोबत विवाह केला. मात्र, शौचास जाते असे सांगून विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी तीने कथीत भावासोबत शहापूर येथून पलायन केले. कुटुंबीयांनी दोघांना पकडून जाब विचारल्यावर ‘बंटी-बबली’चा भांडाफोड झाला. आम्ही दोघे भाऊ-बहिण नव्हे तर पती-पत्नी आहोत असे सांगितले. नंतर शहापूर येथून दोघांना भुसावळात आणून शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, शहापूर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी योगेश संतोष महाजन हे लग्नासाठी स्थळ शोधत होते. याबाबत त्यांनी रावेर येथील परिचित अतुल गुर्जर यांना सांगितले होते. १५ डिसेंबर २०२२ रोजी रसलपूरला गेल्यावर अतुलने त्यांना तुझ्या लग्नासाठी कंडारी (ता.भुसावळ) येथे मुलगी पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघे कंडारी येथे आल्यावर आशाबाई नावाच्या महिलेसोबत परिचय झाला. तिने जया सुधाकर पाटील (रा. सुभाष राेड, नाशिक) व तिचा मावसभाऊ सुनील यांच्यासोबत परिचय केला. जयाने होकार देताच आशाबाईने लग्नाच्या बदल्यात एक लाख रूपयाची मागणी केली. येथे बोलणी नक्की झाल्यावर एका वकिलाकडून नोटरी करून घेत १६ डिसेंबरला जया व योगेशने लग्न लावले.

शाैचाला जाण्याच्या बहाण्याने काढला घरातून पळ
विवाहच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१७) रात्री सुनील व नंतर जयादेखील पडली. कुटुंबीयांनी त्यांच्याकडे विचारणा करताच तिने शौचास जाते असे सांगितले. पण, घरातच शाैचायल आहे असे सांगितल्यावर सुनील पुढे, तर जया त्याच्या मागे धावू लागली. नंतर कुटुंबीयांना त्यांना पकडून विचारणा केली. त्यात दोघे नवरा-बायको असल्याचे समोर आले. नंतर आधारकार्डच्या तपासणीवरून जयाचे खरे नाव निकिता सुधाकर साेळंके (रा.कानाेली, ता.दर्यापूर, जि.अमरावती) तर तिच्या साेबतच्या तरुणाचे नाव विठ्ठल शामराव काकडे (रा.पळशी, ता.सिल्लाेड, जि.औरंगाबाद) असे समाेर आले. दोघांना शहापूर पाेलिस ठाण्यात नेल्यावर भुसावळ येथे पाठवून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी सोमवारी रात्री कंडारी येथून आशाबाईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अतुल गुर्जरचा शाेध सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...