आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज:बीएसएनएल सौर प्रकल्पामुळे 15 कोटी रुपयांची वीज वाचली

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीएसएनएलच्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे महाराष्ट्रात १५ कोटी रुपयांची वीज वाचली आहे. महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रमाकांत शर्मा हे शनिवारी सकाळी ११ वाजता टेलिफोन भवनच्या छतावरील १३० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाच्या अनावरणप्रसंगी बोलत होते. या निमित्ताने जळगावसह पाचोरा, अमळनेर, धुळे येथील ग्राहक सेवा केंद्रांचे डिजिटल माध्यमातून अनावरण करण्यात आले. मुख्य महाव्यवस्थापक शर्मा यांनी जळगाव, धुळे येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध विकास योजनांबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, सौर ऊर्जेमुळे १५ कोटी रुपयांची वीज वाचण्यात मदत झाली आहे. तसेच १५ टक्के महसूल मिळून नफाही वाढला. ऑगस्टपर्यंत ११ हजार फोर जी मायक्रो व्हीटीएस, ४०० साईट लाँच होणार आहे. बीएसएनएलच्या ६५ टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तसेच फोर जी मोबाइल सेवा, हायस्पीड फायबर इंटरनेट कनेक्शन, एफटीटीएच आदींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. महाप्रबंधक संजयकुमार केसवाणी यांनी प्रास्ताविक केले. चेतन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. बीएसएनएलचे उपमहाव्यवस्थापक संजय जैन, जी. एम. इंगळे, जे. पी. दामले, सहाय्यक उपमहाव्यवस्थापक आर. एस. नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. चेतन जाधव, व्ही. के. घोंगडे, पी. एस. बोरसे, एच. एम. चौबे, विकास बोंडे, नीलेश वाणी, राहुल जगताप, मयूर लाठी यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...