आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:दोन दुचाकी चोरट्यांसह खरेदीदारही अडकला एलसीबीच्या जाळ्यात; तिघांना अटक, चोरीची दिली कबुली

यावल17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावलसह फैजपुरात दुचाकी चोरी करून ती अल्प किमतीत विक्री करणारे तसेच तिची खरेदी करणारा अशा तिघा भामट्यांच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. तुषार संतोष सपकाळे (वय २२), तेजस विकास सपकाळे (वय २०), दोघे रा.अंजाळा, ता.यावल व राहुल शाम मोरे (वय २०), रा.हनुमंतखेडा, ता.एरंडोल) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
तालुक्यातील अंजाळे येथील दोन तरुण हे दुचाकी चोरी करुन विक्री करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले.

पोलिस अंमलदार दीपक पाटील, महेश महाजन, नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, अशोक पाटील यांच्या पथकाला अंजाळा येथे रवाना केले. अंजाळा येथून संशयित तुषार सपकाळे व तेजस सपकाळे या दोघांना पथकाने अटक केली.

एरंडोलच्या खरेदीदारास अटक
त्यांनी फैजपूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच यावल येथून चोरलेली दुचाकी एरंडोल तालुक्यातील राहुल मोरे यास विक्री केल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने राहुल मोरे यासही अटक केली. या तिन्ही संशयितांना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी यावल पोलिसांच्या ताब्यात दिले.

बातम्या आणखी आहेत...