आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँक्रिटीकरण अखेर पूर्ण:बाजारपेठ पोलिस ठाणे-एचडीएफसी बँकेपर्यंत काँक्रीट रस्ता अखेर खुला

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत बाजारपेठ पोलिस ठाणे ते मान रेसिडेन्सी पर्यंत रखडलेले रस्ता काँक्रिटीकरण अखेर पूर्ण झाले. मंगळवारी आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते या कामाचे लोकार्पण झाले. या मार्गावरील एचडीएफसी बँकेजवळ पावसाळ्यात नेहमी पाणी साचत होते. काँक्रिटीकरणामुळे ही समस्या सुटेल.

बाजारपेठ पोलिस ठाणे ते एचडीएफसी बँकेच्या नाल्यापर्यंत आरसीसी रोड व गटार बनवणे व उर्वरित रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. आमदार सावकारे यांच्या हस्ते मंगळवारी त्याचे लोकार्पण होऊन हा रस्ता खुला करण्यात आला. पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, युवराज लोणारी, गिरीश महाजन, राजेंद्र आवटे, देवा वाणी, प्रा. दिनेश राठी, कंत्राटदार योेगेश पाटील आदी उपस्थित होते.

लोखंडी पुलाजवळील कामाचीदेखील पाहणी
आमदार सावकारे यांनी लोखंडी पूल ते महाराणा प्रताप चौकापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. या कामामुळे रस्ते पादचाऱ्यांसाठी बंद केले जात आहेत. त्यामुळे या भागातील अनेक व्यावसायिकांनी ओरड केली.

बातम्या आणखी आहेत...