आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणाव:पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे दोन गटातील वाद टळला ; जमावातून पसार संशयिताला अटक

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पालिका कार्यालयाजवळ शुक्रवारी दुपारी तीन वाजता दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने, तणाव निर्माण होण्यापुर्वीच शहर पोलिसांनी जमावाला पांगवले. यावेळी जमावात आर्थिक गुन्हे शाखेला हवा असलेल्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी दुपारी पालिकेच्या बाहेर दोन गटात किरकोळ कारणावरुन वाद झाला. घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, सहाय्यक फौजदार संजय पाटील, संदेश निकम, सोपान पाटील यांनी पालिका कार्यालय गाठत जमावाला पांगवले. यावेळी २०१८ मध्ये दाखल झालेल्या आर्थिक गुन्हे शाखेतील गुन्ह्यात, संशयीत विनोद निकम यास पोलिसांनी जमावातून ताब्यात घेतले. त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. याप्रकरणी विनोद निकम, किशोर वानखेडे यांनी परस्परविरोधी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...