आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:सरदार पटेल यांच्यामुळेच देश अखंड; खडसे यांचे प्रतिपादन

वरणगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची अखंडता टिकवून ठेवण्यात भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान आहे. अन्यथा या देशाचे ३६५ राष्ट्र निर्माण झाले असते. त्यामुळे सरदार पटेल यांची जयंती एकता दिवस म्हणून साजरी केली जाते, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. वरणगाव येथे जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

माजी नगरसेवक सुधाकर जावळे, अतुल झांबरे, दूध संघाच्या माजी संचालिका शामल झांबरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, तालुका उपाध्यक्ष दीपक मराठे, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील, राजेश इंगळे, इफ्तेखार मिर्झा आदी उपस्थित होते. यावेळी खडसे म्हणाले की, वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. कार्यक्रमासाठी हितेश भंगाळे, किशोर भंगाळे, लल्ला माळी, कैलास माळी, मयूर बोंडे, योगेश जावळे, सुजित जावळे, मयूर भंगाळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...