आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलडाणा जिल्ह्यातील वासीम तालुक्यातील शिरपूर येथील पार्श्वनाथ मंदिराच्या पावणे सात फूट उंच, तीन फूट रुंद कळस व सात फूट लांब, अडीच फूट रुंद असलेला ध्वज रथयात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे. हा रथ गुरुवारी दुपारी ३.३० वाजता धुळे, अमळनेर, धरणगाव येथून जळगाव येथील काव्यरत्नावली चाैकातील श्री धर्मनाथ भगवान जैन मंदिराजवळ दाखल झाला आहे.
सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करणाऱ्या कळस व ध्वजाची मंदिरापासून ते शिवरामनगरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली हाेती. या वेळी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती. सर्वधर्मीयांच्या दर्शनार्थ हा कळस व ध्वज शुक्रवारी टाॅवर चाैकातील श्री वासूपूज्य भगवान जैन मंदिरात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रथ जामनेरकडून बुलडाणा जिल्ह्याकडे रवाना हाेणार असल्याची माहिती श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघाने दिली. श्री धर्मनाथ भगवान जैन मंदिर परिसरापासून कळस व ध्वज रथ यात्रेच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. सात फुटांचा कळस एका गाडीत काचेत बंद दालनात ठेवला हाेता. या रथाच्या मागे महिला भाविक सात फुटी ध्वज आपल्या डोक्यावर घेऊन जात हाेत्या. या वेळी ललित लोढया, नयन शाह, दिलीप गांधी, शांतीलाल जैन, सुमतीभाई टाटीया उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.