आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय‎ औरंगाबाद खंडपीठाने केला रद्द‎

भुसावळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या गेल्या निवडणुकीत‎ भाजपच्या कमळ चिन्हावर‎ निवडून आलेल्या नगरसेवकांनी,‎ पालिकेची मुदत संपण्यापूर्वी‎ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला‎ होता. त्यामुळे माजी नगराध्यक्ष‎ रमण भोळेंसह नऊ‎ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी‎ अपात्र घोषित केले होते. या‎ प्रकरणी नगसेवकांनी औरंगाबाद‎ खंडपीठात याचिका दाखल‎ केली होती.

या याचिकेवर‎ सोमवारी (दि. ६) न्या. अरुण‎ पेडणेकर यांनी निकाल दिला.‎ जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ दिलेल्या सहा वर्षांसाठीची‎ अपात्रता रद्द केली आहे. केवळ‎ एका टर्मसाठी अपात्रता करण्यात‎ आली. मात्र मुळातच टर्मचा‎ कालावधी संपल्याने आता‎ अपात्र नगरसेवकांना पालिकेची‎ पुढील निवडणूक लढता येणार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ आहे.‎ पालिकेच्या २०१६ च्या‎ निवडणुकीत लोकनियुक्त‎ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह‎ नऊ नगरसेवक भाजपच्या‎ चिन्हावर निवडून आले होते.‎

यांना मिळाला दिलासा‎
सहा वर्ष अपात्रेचा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने रद्द केल्यामुळे माजी‎ नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह माजी नगरसेवक अमोल इंगळे (‎ प्रभाग १ - ब),लक्ष्मी रमेश मकासरे ( प्रभाग १ अ), सविता रमेश‎ मकासरे (प्रभाग २ अ), प्रमोद पुरुषोत्तम नेमाडे (प्रभाग ६ ब), मेघा‎ देवेंद्र वाणी (१० अ), अॅड. बोधराजदगडू चौधरी (९ ब), शोभा‎ अरुण नेमाडे (२० अ), किरण भागवत कोलते ( २२ ब), शैलजा‎ पुरुषोत्तम नारखेडे (प्रभाग १९ अ) यांना दिलासा मिळाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...