आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून आला:मृगाच्या आनंदसरी; 15 मिनिटांत 8 मिमी पाऊस

भुसावळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरात सलग १५ मिनिटे मृगसरी कोसळल्या. यंदाच्या पावसाळ्यातील या पहिल्याच पूर्वमान्सून आनंद सरींनी भुसावळ शहर न्हाऊन निघाले. गेल्या तीन महिन्यांपासून उच्चांकी तापमानाने जिवाची काहिली झालेल्या भुसावळकरांना यामुळे दिलासा मिळाला. दरम्यान, १५ मिनिटांत शहरात सुमारे ८ मिमी पावसाची नोंद झाली.

भुसावळ शहरासह तालुक्यात रविवारी (दि.१२) दुपारी ४ ते ४.१५ वाजेच्या सुमारास १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. पाऊस दमदार नसला तरी पहिल्याच मृग सरींनी दिलासा मिळाला. यापूर्वी, शहरात शुक्रवारी (दि.१०) रात्री सव्वानऊला पाच मिनिटे मान्सूनपूर्व सरींचा शिडकावा झाला होता. नंतर शनिवारी मृगाच्या आनंदसरी, १५ मिनिटांत ८ मिमी पाऊसतालुक्यातील वरणगाव व पिंपळगाव या दोन्ही महसूल मंडळात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. वरणगाव मंडळात १० मिमी, तर पिंपळगाव मंडळात १२ मिमी पाऊस झाला. भुसावळ शहर आणि कुऱ्हा पानाचे परिसर मात्र कोरडाठाक असल्याने पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान, रविवारी सकाळी निरभ्र वातावरण होते. दुपारी अडीच वाजेनंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन दुपारी चार ते सव्वाचार दरम्यान १५ मिनिटे पावसाने हजेरी लावली. कुऱ्हे पानाचे परिसरात देखील मेघगर्जनेसह हलक्या सरी पडल्यामुळे शेतकरी आनंदले.

रविवारच्या बाजारात उडाला गोंधळ : रविवारी शहराचा आठवडे बाजारात गर्दी होती. दुपारी अचानक पाऊस झाल्याने विक्रेते व ग्राहकांचा गोंधळ उडाला. यानंतर बाजारातील गर्दी ओसरली. वाऱ्याचा वेग वाढल्याने विक्रेत्यांनी उन्हापासून संरक्षणासाठी लावलेल्या ग्रीननेट उडाल्या.

तापमानात घट
दुपारी १ वाजता शहराचे तापमान ४१ अंश होते. मात्र, पंधरा मिनिटे मृगसरी कोसळल्यानंतर पारा झपाट्याने खाली आला. दुपारी साडेचार वाजता तापमान ३३ अंश होते. अवघ्या साडेतीन तासांमध्ये ७ अंशांची घट झाली.

खूप उशीर झालेला नाही
सध्याचा पाऊस पूर्वमोसमी आणि मोसमी पावसादरम्याची स्थिती आहे. पुढील ७२ तासांत देखील पाऊस होईल. जळगावात ९ जूननंतर पावसाचा अंदाज होता. मात्र, आता झालेली सुरूवात खूपच उशिर झाला असे म्हणता येणारी नाही. मुंबईपर्यंत धडकलेला मान्सून खान्देशात सक्रिय होईल.
डॉ.अनुपम कश्यपी,
वरिष्ठ हवामान तज्ज्ञ, आयएमडी, पुणे

खंडित वीजपुरवठा
पावसानंतर शहरातील न्यायालय फीडरवर चारवेळा वीजपुरवठा खंडित झाला. शांती नगर, सतारे, नाहाटा चौफुली सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या फीडरवरही वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ६ वाजेनंतर ही अडचण सुटली. यामुळे दिलासा मिळाला.

बातम्या आणखी आहेत...