आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:विभागातील 35 रेल्वे स्थानकांचा‎ विकास आरखडा महिनाभरात येणार‎

भुसावळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेमध्ये प्रवाशांना सुविधा‎ देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न‎ केले जात आहेत. याच‎ पार्श्वभूमीवर अमृत भारत योजनेतून‎ भुसावळ विभागातील ३५ रेल्वे‎ स्थानकांचा कायापालट हाेणार‎ आहे. या ३५ स्थानकांची पाहणी‎ डीआरएम एस.एस.केडिया हे करत‎ आहेत. प्रत्येक स्थानकांसाठी स्वतंत्र‎ आर्किटेक्ट नियुक्त करण्यात आला‎ आहे. त्यांच्याशी चर्चा करून‎ विकासाच्या दृष्टीने प्रत्येक‎ स्थानकाचा विकास आराखडा‎ महिनाभरात तयार करण्याच्या‎ सूचना डीआरएम केडिया यांनी‎ दिल्या.‎

डीआरएम केडीया यांच्यासह‎ वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डाॅ.‎ शिवराज मानसपुरे, वरिष्ठ विद्युत‎‎‎‎‎‎‎‎‎ अभियंता पालटासिंग, वरिष्ठ‎ विभागीय सिग्नल अॅण्ड दूर संचार‎ प्रबंधक विजय कांची यांच्यासह‎ विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी‎ व कर्मचारी उपस्थित हाेते.‎ डीआरएम केडिया यांनी प्रत्येक‎ स्थानकांवर प्लॅटफाॅर्मची लांबी,‎ रूंदी यांचा आढावा घेतले. सरकते‎ जीने, लिफ्ट, वेटिंग रुम, पादचारी‎ पूल, पार्किंग, शेड, बैठकव्यवस्था‎ याबाबत आर्किटेक्ट यांच्याशी‎ चर्चाकेली. महिनाभरात ३५‎ स्थानकांचे अद्ययावतीकरणाचे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ ड्रॉईंग तयार करण्याच्या सूचना‎ डीआरएम केडिया यांनी दिल्या.‎

लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा‎
डीआरएम केडिया यांनी देवळाली‎ रेल्वे स्थानकावर लष्करी‎ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.रेल्वे‎ स्थानकावर हाेणाऱ्या विकास‎ कामांबाबत चर्चा केली. रेल्वेचे‎ नियाेजन कसे असेल,याची माहिती‎ दिली.देवळाली स्थानकावर काय‎ सुविधा हव्यात याबाबत चर्चा केली.‎

बातम्या आणखी आहेत...