आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्ग:16 धरणे भरतील एवढ्या पाण्याचा हतनूरमधून विसर्ग

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीच्या तुलनेत यंदा हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरणातून आतापर्यंत तब्बल ६ हजार २७२ दलघमी पाण्याचा तापी नदीत विसर्ग करण्यात आला आहे. या पाण्यातून हतनूरसारखी १६ धरणे भरली असती. दरम्यान, या विसर्गानंतर सध्या धरणात ५२ टक्के साठा आहे. पुढील नियोजनानुसार धरण १० ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के भरेल.

हतनूर धरणातून गेल्या वर्षी सुमारे ५ हजार दलघमी पाण्याचा विसर्ग झाला होता. यंदा मात्र तो वाढून ६ हजार २७२ दलघमीवर पोहोचला आहे. हतनूर धरण मान्सून हंगामात अखेरच्या टप्प्यात भरले जाते. पोस्ट मान्सून प्रकारातील या धरणातून पूर नियंत्रणासाठी विसर्ग केला जातो. पूर व्यवस्थापनाच्या नियमांनुसार २१ ऑगस्टपर्यंत धरणात ४६ टक्के साठा केला जातो. यंदा ही पातळी विसर्ग करुन गाठली गेली. तूर्त मात्र धरणातील आवक कमी झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

यंदा चांगला पाऊस झाला
प्रशासनाने १५ सप्टेंबरला होणारी ७२ टक्के जलसाठ्याची पातळी गाठण्यासाठी नियोजन केले आहे. धरणातून विसर्ग करुन १५ सप्टेंबरपर्यंत ७२ टक्के साठा केला जाणार आहे. यंदा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. यामुळे गतवर्षाच्या तुलनेत किमान १२५० दलघमी अधिक विसर्ग झाला. एस.जी.चौधरी, शाखा अभियंता

बातम्या आणखी आहेत...