आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर:जिल्हा रुग्णालयाला मिळेल निवासी डॉक्टर

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना जिल्हा निवासी कार्यक्रम बंधनकारक केले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालययांना निवासी डॉक्टर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व निवासी डॉक्टरांसाठी बंधनकारक असेल.

जिल्हा रुग्णालयांत गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध व्हाव्या यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दोन वर्षांपूर्वी देशभरातील सर्व वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना त्यांच्या तीन वर्षात अभ्यासकाळात तीन महिने जिल्हा रुग्णालयात काम करावे लागेल असे निर्देश दिले होते. कोरोनामुळे या उपक्रमाची अंमलबजावणी झालेली नव्हती. या वर्षापासून मात्र त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे तीन महिने डॉक्टर मिळतील.

बातम्या आणखी आहेत...