आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुध निर्माणी:आयुध निर्माणीत कर्मचाऱ्यांनी केले काळ्या फिती लावून काम

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी शनिवारी (दि.१) निगमीकरण विरोध दिवस पाळला. यानिमित्त सर्वांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. एआयडीईएफई, बीपीएमएस, सीआयडीआरए या संघटनांच्या फेडरेशनच्या आदेशानुसार स्थानिक स्तरावर सर्व युनियन, असोसिएशनने एकत्र येऊन विरोध प्रदर्शन केले. केंद्र शासनाने आयुध निर्माणींचे निगमीकरण केले होते. १ ऑक्टोबरला या निर्णयाला वर्ष पूर्ण झाले. यामुळे देशभरातील ४१ आयुध निर्माणींमध्ये सुमारे ७६ हजार कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. भुसावळ आयुध निर्माणीत सर्व युनियनच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. १ ऑक्टोबर या निगमीकरण विरोध दिनी सर्व कामगार मुख्य गेटवर जमा झाले.

तेथून काळ्या फिती लाऊन कामावर गेले. निगमीकरण हे सरकारी संस्थान संपवण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे सूर यावेळी उमटले. ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियनचे अध्यक्ष आशिष मोरे, महासचिव व जेसीएम ३ चे सदस्य दिनेश राजगिरे यांचे नेतृत्वात नीलेश देशमुख, किशोर बढे, एससी एसटी ओबीसीचे अध्यक्ष किशोर रील, विनोद तायडे, बहुजन सुरक्षा कर्मचारी युनियनचे दीपक सपकाळे, संजय अहिरे, एम.बी.वानखेडे, सिडराचे विनोद पवार, मामा बाविस्कर, मोहन सपकाळे, जितू आंबेडकर, राजू तडवी आदींचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...