आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाेरगाव पंचायतीतर्फे सामूहिक विवाह:फेब्रुवारीत होणार आयोजन, ईच्छुकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे, भुसावळतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात केले जाणार आहे. पंचायतीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भाेरगाव लेवा पंचायतीतर्फे यंदा पाचव्यांदा सामूहिक विवाहाचे आयाेजन केले जात आहे.

यावेळी पंचायतीचे संचालक, प्रकल्प चेअरमन उपस्थित होते. ज्यांना सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी व्हायचे आहे, अशा वधु-वरांनी व त्यांच्या पालकांनी त्वरित नावनोंदणी करावी. या सोहळ्यात वैदिक पद्धतीने विवाह केला जाणार आहे. संस्थेततर्फे गॅस शेगडी, सिलिंडर, मिक्सर, कुकर, संसारोपयोगी साहित्य, पैठणी व ड्रेस असे २० हजारांचे साहित्य दिले जाणार आहे. नावनोंदणी करण्यासाठी विवाहेच्छुकांनी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जामनेर राेडवरील भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...