आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजीवनमुक्तीचा अंतिम मार्ग हरिनाम संकिर्तन अाहे, असे विचार डाॅ. रेखा पाटील यांनी व्यक्त केले. जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा संघाचे अध्यक्ष आर. आर. बावस्कर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. "कलियुगात हरीनाम संकीर्तन’या विषयावर त्यांनी प्रवचन दिले. कलियुगात स्वतःचा उद्धार करायचा असेल, मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्यासाठी केवळ एकच मार्ग आहे ताे म्हणजे हरिनाम संकीर्तन. मुक्ती म्हणजे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या चार प्रकारच्या दुःखापासून मुक्ती. या चार गोष्टी जीवात्म्यासाठी स्वाभाविक नाहीत.
जीवात्मा नित्य आहे. शरीराचा नाश झाल्यानंतर सुद्धा जीवात्मा नष्ट होत नाही. त्याला दुसरे शरीर प्राप्त होते. आपण सर्वजण नित्य, शाश्वत आहोत. भगवंत देखील शाश्वत आहेत. भगवंत सांगतात. आता तुम्ही जन्म-मृत्यूच्या चक्रात फसलेला आहात. या भयावह चक्रातून तुम्ही मुक्त होऊन माझ्या शाश्वत धामात परत या. हीच खरी मुक्ती आहे, असे त्या म्हणाल्या.
जीवन क्षणभंगूर : बावस्कर जीवन क्षणभंगूर असून त्याला अध्यात्माची जोड दिली तर ते जगल्याचे सार्थक होते. सर्वांनी दिवसातून एक वेळ पाच मिनिटे हरिनाम करावे, असा सल्ला त्यांनी दिला. पोपटराव पाटील यांनी आभार मानले. पसायदान आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वितेसाठी कोषाध्यक्ष शांताराम बोबडे व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.