आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:तापी नदीचा पूर ओसरला; तरीही अशुद्ध पाणीपुरवठा

भुसावळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तापी व पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे शहरात गेल्या पंधरवड्यापासून गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून हतनूरमधील विसर्ग कमी होताच तापीचा पूर ओसरला. यामुळे शहरात शुद्ध पाणीपुरवठा होईल, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.

गेल्या पंधरवड्यात हतनूरचे ४१ दरवाजे उघडून विसर्ग झाला. यामुळे तापी नदीला पूर आला. या पुराच्या पाण्यात माती, गाळ असतो. हाच गाळ पुढे पालिकेच्या तापीतील बंधाऱ्यात साचतो. परिणामी शहरात गाळमिश्रित पाणीपुरवठा होतो. मात्र, पुराचे पाणी ओसरल्यानंतर या समस्येची तीव्रता कमी होते. आता हतनूरमधील विसर्ग कमी झाल्याने शुद्ध पाण्याऐवजी नळांमधून थेट चिखलासारखे पाणी मिळते. पावसाळ्यात चांगल्या दर्जाचे अॅलम व क्लोरिन वापरुन पाणी शुद्ध करणे अपेक्षित आहे. मात्र, समस्येने कहर केला आहे.

दर्जेदार अॅलम वापरा
गाळमिश्रित पाण्यामुळे काविळ, टायफाईड, डायरिया या आजारांचा धोका आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा जीर्ण व कालबाह्य असली चांगल्या दर्जाचे अॅलम वापरल्यास शुद्ध पाणीपुरवठा होऊ शकतो, असा जाणकारांचा दावा आहे.

बातम्या आणखी आहेत...