आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:बळजबरीने रंग लावणाऱ्या पथरोडला ‘खाकी’ने धुतले, महिलेच्या घरावर दगडफेक, अनधिकृत प्रवेश करून धिंगाणा

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरडाओरड करत महिलेच्या घरावर दगडफेक करणाऱ्या विष्णू पथरोडने दुसऱ्या महिलेच्या घरात शिरून तिला बळजबरीने रंग लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी विष्णू पथरोडसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंतर पथरोडला पोलिस खाक्या दाखवून पायी चालत पोलिस ठाण्यात आणले.

शुक्रवारी (दि.१८) रात्री १० वाजेच्या सुमारास विष्णू पथरोड, राहुल रंगनाथ पाटील व पांडे अशा तिघांनी गोंधळ घालत एका महिलेच्या घरावर दगडफेक केली. दुसऱ्या महिलेच्या घरात बळजबरीने शिरून विनयभंग केला. ही माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांनी घटनास्थळ गाठून विष्णू पथरोड ताब्यात घेतले. त्याचे दोन सहकारी मात्र पसार झाले. यानंतर पोलिसांनी पथरोडला पोलिसी खाक्या दाखवून थेट शहर पोलिस ठाण्यापर्यंत पायी चालवत आणले. ज्या भागात त्याची दादागिरी आहे, तेथे त्याची धुलाई देखील केली.

बातम्या आणखी आहेत...