आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:घरकुल लाभार्थ्यांचे पूर्ण शुल्क माफ करावे

यावलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाडळसे गावातील आवास योजना प्रपत्र ब मधील एकूण २४ जागा नसलेल्या लाभार्थ्यांसाठी गावठाण हद्दीतील शासकीय जागा नियमित करण्याबाबत नुसार असणारी शासकीय फी संपूर्ण माफ व्हावी, अशी मागणी येथील लाभार्थ्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली.

तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पाडळसे येथे पाण्याची टाकी (जलकुंभ) बोअरवेल व गावांतर्गत पाइपलाइनचे काम लवकरात लवकर सुरू होण्याबाबतही मंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथे जावून निवेदन त्यांना दिले. यावेळी सरपंच ज्ञानेश्वर तायडे, पोलिस पाटील सुरेश खैरनार, सय्यद नुरअली आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...