आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:शेतकऱ्यांचे वीज बिल‎ शासनाने माफ करावे

मुक्ताईनगर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री‎ अब्दुल सत्तार हे सप्टेंबर महिन्यात‎ मुक्ताईनगर दौऱ्यावर आले होते.‎ त्यांनी सीएमव्ही रोगाबाबत‎ शेतकऱ्यांना मदत देण्याचे‎ आश्वासन दिले होते. परंतु‎ आजतागायत शेतकऱ्यांना‎ कोणतीही मदत मिळालेली नाही.‎ सरकारने समस्यांचा गांभीर्याने‎ विचार करून शेतकऱ्यांना वीजबिल‎ माफ करावे, अशा मागणीचे निवेदन‎ मुक्ताईनगर तहसीलदारांना राष्ट्रीय‎ काँग्रेसने दिले.‎ कापूस, कांदा, टोमॅटो व इतर‎ पिकांना भाव नाही. केळी उत्पादक‎ शेतकरी सी.एम.व्ही.रोगाच्या‎ प्रादुर्भावामुळे त्रस्त आहेत.‎

रासायनिक खतांचे भाव गगनाला‎ भिडले आहेत आणि रासायनिक‎ खते वेळेवर मिळत नाही. मजुरांची‎ टंचाई जाणवते आहे. त्यामुळे‎ सरकारने या सर्व समस्यांचा‎ गांभीर्याने विचार करून सरसकट‎ शेतकऱ्यांना वीजबिल माफ करावे,‎ अशी मागणी मुक्ताईनगर तालुका‎ काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल वाडीले,‎ अंतुर्ली शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख‎ भैय्या शे. करीम, सोनू सिंग,‎ नारायण पाटील, प्रकाश कोळी,‎ सुनील पाटील, देवराम पाटील,‎ रामदास पाटील, भास्कर सोनवणे,‎ विजय दुट्टे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...