आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील अट्रावल ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम करणाऱ्या प्राैढ मजुराचा विहिरीत उतरताना हात निसटल्याने विहिरीत पडून जागीच ठार झाला. वरून काेसळल्याने त्यास जबर दुखापत झाली हाेती. भीमा अंकात कोळी (वय ५०) असे या मजुराचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेवेळी विहिरीत एक तरुण काम करत होता. मात्र हात निसटल्यावर काेळी काउंटरवर आदळून अडकले. जर ते त्या तरुणाच्या अंगावर पडले असते तर अनर्थ आेढवला असता.
अट्रावल येथील मुंजोबा मंदिराजवळील ग्रा.पं. विहिरीचे खोदकाम सुरू आहे. खोदकामासाठी विहिरीत लखन दिनकर कोळी (वय ३२) हा तरुण उतरला होता. नंतर रात्री विहिरीत खोदकामासाठी भीमा अंकात कोळी हे उतरत होते. परंतु अचानक त्यांचा हात निसटल्याने ते विहिरीत कोसळले. विहिरीला लावलेल्या काउंटरवर ते आदळल्याने त्यांना जबर दुखापत झाली. ते काउंटरवर अडकून पडले. तेथेच त्यांचा मृत्यू आेढवला.
या घटनेनंतर त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथील पोलिस ठाण्यात लखन कोळी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक किशोर परदेशी करत आहे. मृत भीमा कोळी यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.