आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा:पेटलेले झाड 33 केव्ही वाहिनीवर पडले; वीजपुरवठा 18 तास खंडित

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खेडी १३२ केव्ही सबस्टेशनमधून जीआयएस ३३ बाय ११ केव्ही सबस्टेशनला जोडणाऱ्या ३३ केव्ही लाइनवर पेटवलेले झाड कोसळले. यामुळे शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजेपासून सबस्टेशन पूर्णपणे बंद झाले. परिणामी साकरी, भुसावळ टाऊन, खडका रोड, सहकारी औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी सायंकाळी ६ वाजता तब्बल १८ तासानंतर हा वीजपुरवठा सुरळीत झाला.

शहरातील वरणगाव रोडवरील जीआयएसमधील (सहकारी औद्योगिक वसाहती) ३३ बाय ११ केव्ही उपकेंद्राला खेडी १३२ केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. हा पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वाहिनीवर शनिवारी मध्यरात्री १२.३० वाजता पेटलेले झाड कोसळले. यामुळे वीज वाहिनी तुटली. दोन वीज पोल तुटून जीआयएस सबस्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाला.

या सबस्टेशनवरुन वीजपुरवठा होणारे खडका व साकरी गाव, भुसावळ शहरातील शिवाजी नगर, प्रल्हाद नगर, पंधरा बंगला परिसर, खडका रोड या तीन फीडरवरील भागांचा वीजपुरवठाही खंडित झाला. महावितरण कंपनीने चित्राक्षी एंटरप्राईजेसच्या पाच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रविवारी सकाळी दुरुस्ती हाती घेतली. सायंकाळी ६ वाजता काम पूर्ण झाल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला. महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, सहाय्यक अभियंता पंकज वाघुळदे, रवींद्र पद्मे, तुषार हिंगणे, अनिमेष काळे हे तळ ठोकून होते.

झाड पेटवणाऱ्यांना शोधा
झाडांच्या बुध्यांना आग लावून ते नष्ट करण्याचा सपाटा भुसावळ विभागात सुरू आहे. याच पद्धतीने पेटवलेले झाड वीजतारांवर पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तीन फीडरवर असलेल्या सुमारे १५ हजार लोकसंख्येला रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणने झाड पेटवणाऱ्या व शेतमालकाचा शोध घेवून गुन्हे दाखल करावे. नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी वीज ग्राहकांनी केली.
काम पूर्ण झाल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला. महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, सहाय्यक अभियंता पंकज वाघुळदे, रवींद्र पद्मे, तुषार हिंगणे, अनिमेष काळे हे तळ ठोकून होते.

खडका येथे जोडणी
जीआयएस सबस्टेशनच्या अंतर्गत जोडणी असलेल्या खडका गावाचा वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, खडक्याला एमआयडीसी किन्ही सबस्टेशनमधून पर्यायी वीजजोडणीची सुविधा आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ही जोडणी करुन गावात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तत्पूर्वी, खडका ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली.वाकलेले पोल, तुटलेल्या वीज तारा जोडताना अधिकारी व कर्मचारी.

बातम्या आणखी आहेत...