आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:फिरत्या न्यायालयात चार प्रकरणे निकाली ; वरणगावात राबवला न्याय आपल्या दारी उपक्रम

भुसावळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालाच्या औरंगाबाद खंडपीठातर्फे तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे, शुक्रवारी न्याय आपल्या दारी मोबाईल व्हॅनचे आयोजन वरणगाव येथे केले होते. तालुका विधी सेवा प्राधीकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश व्ही.सी. बर्डे याच्या अध्यक्षतेखाली, दिवाणी न्यायाधीश के.एस. खंडारे यांनी मोबाईल व्हॅनचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी चार खटले निकाली काढण्यात आले. मोबाईल व्हॅन न्यायालयाच्या आवारतून निधून वरणगाव येथे नेण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे वेळी अॅड. राजेश कोळी, अॅड. कैझर भारमल, अॅड. व्ही.के. फिरके, वरणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशीष अडसूळ, न्यायालयातील कर्मचारी एस.आर. पाटील, डी.ई. बोदडे, एम.आर, चौधरी, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एस. जगदाळे यांनी केले. न्यायाधीश के.एस. खंडारे, वकील राजेश कोळी, अॅड. कैझर भारमल यांनी लोक अदालतीमध्ये तडजोडी बाबत मार्गदर्शन केले. चार खटले निकाली काढण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...