आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संतप्त:ऊसतोडणी रखडल्याने मुक्ताई कारखान्याचा ताफा अडवला; भुसावळातील पिंप्रीसेकम, फुलगाव, कठोरा परिसरातील शेतकरी संतप्त

भुसावळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी, मार्च महिन्यात अपेक्षित असलेली उसाची तोड घोडसगाव (ता.मुक्ताईनगर) येथील संत मुक्ताई साखर कारखान्याने मे महिना सुरू होऊनही केली नाही. उलट भुसावळ तालुक्यातील फुलगाव, पिंप्रीसेकम, कठोरा शिवारातील शेतकऱ्यांना डावलून कारखान्याचे ऊसतोड यंत्र, ट्रॅक्टर व ट्रक नशिराबाद परिसरात ऊस तोडणीसाठी निघाले होते. ही माहिती मिळताच संतप्त शेतकऱ्यांनी विचवा, शिंदी परिसरात हा ताफा अडवून आंदोलन केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

पिंप्रीसेकम, कठोरा, फुलगाव परिसरातील शेतकऱ्यांनी लावलेल्या उसाची फेब्रुवारी, मार्च महिन्यात तोड होणे अपेक्षित होते. मात्र, संत मुक्ताई साखर कारखान्याने वेळेवर ऊस तोडणी केली नाही. या उसाची तोडणी करून होणारे नुकसान टाळावे यासाठी शेतकरी सातत्याने कारखान्याच्या विनवण्या करत आहेत. मात्र, कारखान्याने प्रतिसाद दिला नाही.

उलट या परिसराला डावलून शनिवारी कारखान्याची यंत्रणा नशिराबाद शिवारात ऊस तोडणीसाठी निघाली होती. ही माहिती मिळाल्याने पिंप्रीसेकम, फुलगाव व कठोरा शिवारातील शेतकरी रवींद्रसिंग चाहेल, प्रशांत पाटील, राजेंद्र चौधरी, शुभम बऱ्हाटे, बापू बऱ्हाटे, गणेश तायडे आदींनी विचवा-शिंदी दरम्यान ऊसतोड यंत्र, दोन टॅक्टर, ट्रक अडवून रस्त्यावर ठिय्या मांडला. आधी पिंप्रीसेकम, फुलगाव व कठोरा शिवारातील उसाची तोडणी करावी, अशी मागणी केली. तरीही कारखान्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. ही माहिती मिळाल्याने नशिराबाद येथील शेतकरी गिरीश चौधरी, कमलाकर चौधरी, संदीप टापरे, बेलव्हायचे शेतकरी नरेंद्र नारखेडे, राकेश खाचणे, विकास भंगाळे हे आंदोलनस्थळी पोहोचले. दरम्यान, कारखान्याने ही यंत्रणा परत बोलावून घेतली. दोन्ही भागांत मंगळवारनंतर ऊस तोडणीचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...