आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षात महापालिका शाळांचा दर्जा घसरला आहे. या शाळांमध्ये पुन्हा गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. या अनुषंगाने आता शाळेतील विद्यार्थी संख्येसोबतच शिक्षकांची उपस्थिती तपासण्यासाठी ‘सरप्राइज व्हिजिट’ देण्यात येणार आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची दर महिन्याला चाचणी परीक्षा घेण्यात येईल. त्यातून शिक्षकांना अपडेट केले जाणार असल्याच्या सुचना मुख्याध्यापक व शिक्षण मंडळाला आयुक्तांनी दिल्या आहेत. यामुळे आता पुन्हा एकदा महापालिका शाळा गुणवत्तेकडे वळणार असल्याचे सांगण्यात येते आहे. शहरातील नामवंत व्यक्तींचे शिक्षण हे महापालिका शाळेतून झाले आहे. पुर्वी शिक्षण मंडळ अस्तित्त्वात असल्याने या शाळांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात होते.
मात्र, काही वर्षांपासून हे शिक्षण मंडळ अस्तित्वात नसल्याने शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. या शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आयुक्तांनी सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन गुणवत्ता वाढीबाबत कडक सूचना दिल्या आहेत. त्यात शाळा डिजिटल करण्यासाठी शहरातील संस्थांची मदत घ्यावी तर काही ठिकाणी लोकसहभागातून बदल करावे. याकरिता मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे. यासोबतच शंभर टक्के उपस्थिती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. या वेळी शाळांमधील भौतिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सुचनाही देण्यात आल्या आहे.
तत्काळ आधार अपडेट विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट नसल्याने शासकीय योजनांचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही. याकरिता शिक्षकांनी तत्काळ विद्यार्थ्यांचे शंभर टक्के आधारकार्ड अपडेट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तर जिल्हा परिषद शाळांनी ज्याप्रमाणे शाळा डिजिटल करण्याचा पॅटर्न राबवला आहे. तोच पॅटर्न महापालिका शाळांत राबवला जाईल.
अशा केल्या सुचना दर महिन्याला माता-पालकांची बैठक, गुणवत्ता वाढीसाठी निपुण चाचणी घ्यावी, शाळांमध्ये महिन्याला प्रगत चाचणी घ्यावी, ग्रंथालयांचा वापर वाढवावा, स्पर्धा परीक्षांचा कार्यक्रम, श्लोक, वाचन, गायनासह कलाप्रकार शिकवावे अशा महत्वाच्या सुचना महानगरपालिकेच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षण मंडळाला आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.