आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनीची दुरुस्ती:फुटलेल्या जलवाहिनीची अखेर पालिकेकडून दुरुस्ती; अनेकवेळा पाइपलाइन लिकेज होऊनही प्रशासन दखल घेत नव्हते

भुसावळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जळगाव रोडवरील तहसील कार्यालयासमोर पाइपलाइन फुटल्याने शेकडो लिटर पाण्याची नासाडीचे सुरू होती. सोबतच गळतीमुळे रस्त्यावर जीवघेणा खड्डा पडला होता. याबाबत ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले.

याची दखल घेत पालिकेने मंगळवारी तत्काळ गळती दुरुस्त केली. या गळतीचे पाणी थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचून येणाऱ्या-जाणाऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच ठिकाणी अनेकवेळा पाइपलाइन लिकेज होऊनही प्रशासन दखल घेत नव्हते. मंगळवारी दुपारी मात्र गळती दुरुस्त करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...