आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळण:नाव मॉडर्न, मात्र रस्त्याची खड्ड्यांमुळे झाली चाळण

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य बाजारपेठेतील मॉर्डन रोड सध्या खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. नाव मॉर्डन असले तरी पालिकेच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवर पायी चालणेही कठीण झाले आहे. गेल्या वर्षी या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र केवळ बीबीएम करुन कार्पेट व सिलकोटचे कामाकडे दुर्लक्ष झाले. आता पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे व्यापारी व ग्राहकांना मानपाठ दुखीचा त्रास होत आहे.

१२ कोटी रुपयांच्या निधीतून शहरात रस्ते डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली, मात्र ठेकेदाराने रस्त्यांवर केवळ खडीकरण अर्थात बीबीएम केले. सिलकोट व कार्पेटची कामे रखडली. गेल्या वर्षभरापूर्वी मॉर्डन रोडवर खडीकरण करण्यात आले होते, मात्र यानंतर पुढील कामे न झाल्याने आता पावसानंतर या मार्गावर खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.

तातडीने रस्त्यांची कामे सुरू करा रस्त्यांवर वर्षभरातच खड्डे पडले. ग्राहक व व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेकांना मान, पाठ, कंबरदुखीचा त्रास सुरु झाला आहे. मॉर्डनरोडच काय संपूर्ण शहरात हीच स्थिती आहे. याकडे लक्ष देवून रखडलेली कामे सुरु करावी. विनोद जैन, व्यापारी, मॉर्डनरोड भुसावळ

बातम्या आणखी आहेत...