आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटना:मनसेच्या भुसावळ शहराध्यक्षपदी राहुल‎ सोनटक्के यांची वर्णी, संघटना वाढवणार‎

भुसावळ12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भुसावळ‎ शहराध्यक्षपदी राहुल सोनटक्के यांची निवड झाली आली.‎ पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने व जिल्हा संपर्क‎ अध्यक्ष विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष‎ अॅड. जमील देशपांडे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक यांनी‎ जळगावात त्यांना नियुक्तीपत्र दिले.

भुसावळ शहरात‎ पक्षाची बांधणी, संघटना, वॉर्ड तेथे शाखा याबाबत पक्षाला‎ अभिप्रेत काम करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित‎ शहराध्यक्ष राहुल सोनटक्के यांनी दिली. यावेळी तालुकाध्यक्ष‎ धीरज वाघमारे, संजय कुलकर्णी, सिद्धेश कवठाळकर,‎ मंगेश भावे, धीरज चौधरी, सुजित शिंदे, सचिन राऊत, अनुप‎ कनोजे, नबाब गवळी, हरीश पाटील उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...