आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावणेदोन लाख लोकसंख्येच्या भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार ६४ वर्षे जुन्या पाइपलाइनवर अवलंबून आहे. मात्र, जीर्ण झालेल्या या पाइपलाइनला दररोज गळती लागते. गेल्या वर्षभरात तब्बल ३ हजार ६५० ठिकाणी गळती लागली. या गळतीच्या दुरुस्तीवर पालिकेने कंत्राटदाराच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांचा खर्च करूनही समस्या जैसे थे आहे. अमृत योजना कार्यान्वित झाल्यावरच ही अडचण निकाली निघेल. तोपर्यंत अन्य पर्याय नसल्याने पाणीपुरवठा विभाग हतबल ठरला आहे.
तापी नदीच्या काठावर वसलेल्या भुसावळात सध्या आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. मात्र, दररोज कोणत्या ना कोणत्या भागात गळतीचा प्रकार समोर येत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. अनेकवेळा तर तापीतील बंधारा तुडुंब भरलेला असताना देखील तांत्रिक अडचणी, गळतीमुळे कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागतो. रोटेशन संपूनही पाण्यासाठी दोन-दोन दिवस वाट पाहावी लागते. दरम्यान, पाइपलाइनप्रमाणेच शहरात नळ कनेक्शनला गळती लागण्याचे प्रमाण जास्त आहे. पालिकेकडून नळ कनेक्शन घेताना एक मीटर खाेलीचा खड्डा केला जातो. मात्र, हा नियम धाब्यावर बसून एक मीटर ऐवजी अर्धा ते पाऊण मीटर खोल खड्डा करून नळ कनेक्शन घेतले जाते. त्यावरून अवजड वाहन गेल्यास कनेक्शनला गळती लागते.
१९५८ मध्ये टाकलेल्या जलवाहिनीस लागते गळती
शहरात अनेक ठिकाणी पाइपलाइन बदलण्यात आली असली तरी अद्यापही सुमारे १०० किमी अंतराची जुनी पाइपलाइन अस्तित्वात अाहे. त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. शहरात १९५८ मध्ये पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकली होती. या ६४ वर्षे जुन्या पाइपलाइनवर शहराच्या पाणीपुरवठ्याची मदार आहे. मात्र, या पाइपलाइनला वारंवार गळती लागते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.