आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी युवक काँग्रेसने शनिवारी शहरातील नवशक्ती आर्केडमधील संपर्क कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत गॅस सिलिंडरची अंत्ययात्रा काढून महागाई विरोधात आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात गटबाजी उघड झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे गट, माजी आमदार संतोष चौधरींचे समर्थक व खुद्द राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देखील आंदोलनात सहभागी झाले नाहीत. भाजपचे सरकारच्या ८ वर्षांच्या काळात महागाईने उच्चांक गाठला. घरगुती गॅस, खाद्य तेल, पेट्रोल आणि डिझेलचे तर दररोज वाढते आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला भाव नसला तरी रासायनिक खते, बियाण्यांच्या किमती गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने महागाई विरूद्ध आंदोलनाची हाक दिली होती. त्यात राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. नवशक्ती कॉम्प्लेक्स ते तहसील कार्यालयापर्यंत ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा निघाली. तहसील कार्यालयात राष्ट्रवादीने दुखवटा व्यक्त करुन प्रशासनाला निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.