आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरताळे (ता.मुक्ताईनगर) येथील तरुण भुसावळ बसस्थानकात मेहकर बसमध्ये चढत होता. यावेळी एका भामट्याने त्याचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाइल लांबवला. मात्र, त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. शेख सईद शेख रशीद उर्फ पेंटर (वय ३५, रा. गौसिया नगर, भुसावळ) असे त्याचे नाव आहे.
हरताळे येथील बबलू सुनील साळवे हा तरुण बुधवारी (दि.७) पहाटे पाच वाजेच्या सुमारास मेहकर बसमध्ये चढत होता. संशयित शेख सईद शेख रशीद उर्फ पेंटर याने साळवे यांच्या खिशातून मोबाइल काढला. मात्र, ही बाब लक्षात आल्याने प्रवाशांनी संशयिताला पकडून बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात सोपवले. साळवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तेजस पारीसकर करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.