आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापालिकेने शहरात १० दिवसांऐवजी ७ दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, शहरातील जीर्ण पाइपलाइन पाहता या नियोजनानुसार अंमलबजावणी अशक्यप्राय झाली आहे. कारण, शहरात दररोज कुठेना कुठे पाइपलाइन फुटण्याचे प्रकार होत आहे. याच पद्धतीने सतारे बोगदा परिसरात गेल्या काही दिवसांपासून फुटलेल्या पाइपलाइनमधून पाण्याची नासाडी आणि रस्त्यावर खड्डे पडले आहेत. उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात शहराचा जलस्त्रोत असलेली तापी नदी दुथडी भरुन वाहते. आताही भुसावळात पाऊस नसला तरी हतनूरच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गेल्या आठवड्यात विसर्ग करण्यात आला. यामुळे नदीपात्रात बंधारा तुडुंब भरला आहे.
त्यामुळे पाणीपुरवठ्याचा दहा दिवसांचा कालावधी कमी करुन सात दिवसांवर आणण्यासाठी पालिकेने नियोजन केले. मात्र, जीर्ण यंत्रणा या नियोजनावर पाणी फिरवत आहे. दररोज पाइपलाइन लिकेज होण्याचे प्रकार वाढत आहेत. प्रामुख्याने मेन रायझिंगवरुन समस्या निर्माण होत आहे. आगामी काळात तापी नदीला पूर आल्यास जॅकवेलमध्ये गाळ साचतो. अशावेळी जलशुद्धीकरण प्रक्रियेत उचल केलेल्या पाण्यापैकी सुमारे १० टक्के पाणी गाळाचे वितरण करण्यासाठी वापरले जाते. यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची भीती असते. त्यामुळे भविष्यात दहा दिवसांआड पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडू शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.