आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यविधी:स्मशानभूमीतील टंचाईचा प्रश्न निकाली,‎ अंत्यविधीवेळी होणारी गैरसोय टळणार‎

भुसावळ‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तापी काठावरील‎ स्मशानभूमीत तीन कूपनलिका‎ करण्यात आल्या. मात्र, त्या कोरड्या ‎झाल्याने अंत्यविधीसाठी देखील तापी ‎ ‎ नदीतून पाणी आणावे लागत होते. ही ‎समस्या सोडवण्यासाठी माजी‎ नगरसेवक निर्मल कोठारी यांनी ‎ ‎ स्वखर्चातून कूपनलिका करुन दिली. ‎ ‎ अवघ्या ७० फुटांवर पाणी लागले.‎ यामुळे स्मशानभूमीतील पाण्याचा प्रश्न ‎ ‎ सुटणार आहे.‎ माजी नगरसेवक कोठारी यांनी ‎ ‎ भुसावळ येथील तापी काठावरील हिंदू ‎ ‎ स्मशानभूमी देखभाल दुरुस्तीसाठी‎ दत्तक घेतली आहे.

याठिकाणी विविध‎ सेवांचा पुरवठा करण्यासाठी‎ उपाययोजना सुरु केल्या आहेत.‎ स्मशानभूमीत यापूर्वी अनेक दात्यांनी‎ कूपनलिका केल्या. पण, सुमारे १‎ हजार फूट खोलीवर सुद्धा त्यांना पाणी‎ मिळाले नाही. अशा तीन कूपनलिका‎ निरुपयोगी ठरत होत्या. त्यामुळे‎ अंत्यसंस्कार, खारी सावटणेसाठी‎ (अस्थीसंकलन) आलेल्या‎ नागरिकांना तापी नदीपात्रातून, तर‎ काहींना घरुन पाणी आणावे लागत‎ होते. हा त्रास दूर करण्यासाठी कोठारी‎ यांनी स्वखर्चातून कूपनलिका केली.‎ या कूपनलिकेला ७० फुटांपासून पाणी‎ लागले. २१० फूट खोलीपर्यंत‎ कूपनलिका करण्यात आली.‎

बातम्या आणखी आहेत...