आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील व्यापारी आणि हाॅकर्स यांच्यात काही दिवसांपुर्वी संघर्ष पेटला हाेता. मात्र आता पाेलिस व पालिका प्रशासनाने तिढा सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पालिकेतर्फे शहरातील हातगाडी व्यावसायिकांचे (हॉकर्स) सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. अवघ्या ८ दिवसात ७०० हातगाड्यांची नाेंद झाली आहे. या व्यावसायिकांना स्वतंत्र जागा देण्यासाठी पालिकेतर्फे नियाेजन केले जात आहे. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारेपेठेतील रस्ते माेकळे होणार असून, बाजारातील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल.
शहरातील अप्सरा चाैकासह अन्य ठिकाणी माेठ्या प्रमाणावर हातगाड्या लावल्या जातात. काही हातगाडी व्यावसायीक हे व्यापाऱ्यांच्या दुकानांसमाेर हातगाड्या उभ्या करत असल्याने, व्यापारी व हाॅकर्स यांच्यात वाद हाेतात. २० नाेव्हेंबरला आठवडे बाजाराच्या दिवशी पाेलिस आणि व्यापारी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली हाेती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली हाेती. डीवायएसपी साेमनाथ वाघचाैरे यांनी पुढाकार घेत व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले होते. हाॅकर्सचा प्रश्न पालिकेच्या माध्यमातून साेडवण्यात येईल, असे आश्वासन दिले हाेते. त्यानुसार गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांची बैठक डीवायएसपी कार्यालयात झाली. त्यात डीवायएसपींनी व्यापाऱ्यांची बाजू जाणून घेतली होती.
या बाबींची होतेय नोंद मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी पालिकेच्या माध्यमातून शहरातील हातगाड्यांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. अभियता नितीन लुंगे व त्यांचे सहकारी यांनी शहरातील सर्वच मार्गावरील हातगाड्यांची माहिती संकलित करत आहेत. पालिकेचे कर्मचारी हे शहरातील विविध भागात फिरून रस्त्यावरील हातगाडी व्यायसायिकाचे नाव, किती वर्षांपासून व्यवसाय करत आहे, त्यांचा संपर्क क्रमांक आदींची माहिती नाेंदवत आहेत.
पालिकेसमोर नेहरू मैदानाचा पर्याय शहरातील हाॅकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेतली जाणार आहे. पालिकेतर्फे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल बैठकीत सादर केला जाईल. या बैठकीत हाॅकर्ससाठी पर्यायी जागेबाबाबतही चर्चा केली जाणार आहे. पालिकेतर्फे नेहरू मैदानासह, शहरातील अन्य भागातील माेकळ्या जागांची माहिती संकलित केली जात आहे.
कोणावरही अन्याय होणार नाही हातगाडी व्यवसायीकांना नियाेजित जागा देऊन रस्ते माेकळे केले जातील. व्यापाऱ्यांनीही त्यांचे दुकानाचे साहित्य रहदारीला अडचण हाेईल, अशा पद्धतीने ठेवू नये. याबाबत त्यांनाही सूचना केल्या जातील. सुंदर शहर स्वच्छ शहर ही संकल्पना साकारली जाणार आहे. काेणावरही अन्याय हाेणार नाही. संदीप चिद्रावार, मुख्याधिकारी, भुसावळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.