आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:जीर्ण पाणीपुरवठा केंद्राच्या दुरुस्तीला महिनाअखेर मुहूर्त

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पालिकेच्या जीर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती व नूतनीकरणासाठी आमदार संजय सावकारे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजना कामातून ५ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. आता वर्कऑर्डर व करारनाम्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया सप्टेंबरअखेर कामाला सुरुवात होईल. शहराला पाणीपुरवठ्यासाठी सन १९५८ मध्ये उभारणी झालेली पाणीपुरवठा यंत्रणा आता जीर्ण झाली आहे.

यामुळे वारंवार बिघाड होऊन शहरात कमी दाबाने व अशुद्ध पाणीपुरवठा होता. यावर पर्याय म्हणून अमृत योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र, ही योजना अद्याप अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत जुन्या पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ५ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर झाला. त्यासाठी ठेकेदारास लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येतील.

डिसेंबरपर्यंत काम होईल
जलशुद्धीकरण केंद्रातील सँड फिल्टर, ब्रीज, क्लोरिफाक्युरेटर आदी यंत्रणेच्या पुनरुज्जीवनाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यास पाण्याची मागणी कमी असलेल्या हिवाळ्यात वेग देऊ. त्यामुळे उन्हाळ्यात मुबलक पाणी मिळेल.सतीश देशमुख, पाणीपुरवठा अभियंता, पालिका

बातम्या आणखी आहेत...