आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबरीकरणाची मागणी:खिरोदा ते सावखेडा रस्त्याची झाली दैना; तत्काळ डांबरीकरणाची मागणी

सावखेडा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केळी वाहतुकीसाठी निर्माण झाली समस्या, वाहन चालकांची कसरत

परिसरातील केळी वाहतूक, प्रवासी वाहतूक व इतर माल वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच सावखेडा येथील शेकडो विद्यार्थी खिरोदा येथे याच रस्त्याने ये-जा करत असतात. त्यांना या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांना मणक्यांचे आजार उद्भवू लागले आहेत.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही वेळेस वाहन चालवतांना अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

दोन-तीन वर्षांपूर्वी माजी आमदार स्व. हरिभाऊ जावळे, यांच्या प्रयत्नाने कळमोदा-उटखेडा रस्ता मंजूर झालेला होता. परंतु सावखेडा-खिरोदा हा रस्ता मध्येच अपूर्ण सोडून हा रस्ता कसाबसा पूर्ण केला असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. यात सावखेडा ग्रामस्थांवर अन्यायच झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...