आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवचन:धर्माचा तराजू देश अन् समाज संतुलित ठेवतो ; फैजपुरात मुनिश्री विशेषसागर महाराजांचे प्रवचन

फैजपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म हा एक प्रकारचा तराजू आहे. जो आमचे जीवन, परिवार, समाज व देशाला संतुलित ठेवतो. धर्म हा विश्वप्रेम, शांतता, एकमेकाबद्दल सहिष्णुतेचा भाव आहे. धर्म हा एक दीपस्तंभ आहे. धर्माच्या प्रकाशात चालणारी व्यक्ती कधीच भरकटत नाही, असे प्रतिपादन मुनीश्री विशेष सागरजी महाराज यांनी केले.

फैजपूर येथील प्रवचनात ते बोलत होते. धर्माला दयामयी मानले गेले आहे. धर्माचे मूळ आहे दया. आणि दयेचा अर्थ आहे साऱ्या प्राण्यांवर दयाभाव जोपासणे. धर्म हा आपल्याला मुक्ती देणारा आहे. आपले हित करणारा आहे. धर्माच्या प्रभावाने शत्रुदेखील मित्र होऊन जातो. धर्म हा मुक्ती देणारा आहे. धर्माचा लवलेश नसणारा माणूस हा जिवंत असून देखील मृतासमान आहे. म्हणून धनसंग्रह करू नका तर धर्म संग्रह करा, असे जैन मुनीश्री विशेष सागर महाराज म्हणाले. प्रवचनावेळी डॉ.उमेश चौधरी, दिपाली चौधरी, दंतरोग तज्ञ डॉ.गौरव चौधरी, डॉ.श्रेया गौरव चौधरी यांनी आशीर्वाद घेतले. सुनील जैन, योगेश जैन, किरण जैन, अशोक सैतवाल उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...