आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:आयटीआय प्रवेशाची दुसरी फेरी आजपासून होईल सुरू

भुसावळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील आयटीआयमध्ये पहिल्या फेरीत २०५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. आता सोमवारपासून सुरू फेरी सुरू होत आहे. त्यात ८ ते १२ ऑगस्टदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. यानंतर रिक्त जागा असल्यास तिसरी प्रवेशफेरी देखील राबवण्यात येणार आहे.

औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्ष मुदतीच्या ट्रेडच्या एकुण १९६, तर दोन वर्षे मुदतीच्या १८४ अशा एकूण ३०० जागा आहेत. पहिल्या प्रवेश फेरीत एक वर्ष मुदतीच्या ट्रेडसाठी ९३ प्रशिक्षणार्थींनी प्रवेश घेतला, तर दोन वर्षे मुदतीच्या ट्रेडला ११२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. म्हणजे एकुण ३८० पैकी २०५ (५३.९५ टक्के) जागांवरील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित जागांसाठी सोमवारपासून प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होईल. ती १२ ऑगस्टपर्यंत चालेल. दरम्यान, दोन वर्षांच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिशियन आणि एक वर्षाच्या ट्रेडमध्ये वेल्डरला पसंती मिळताना दिसते असे तज्ज्ञांनी सांगितले.

तिसरी फेरी १६ ऑगस्टला
दुसऱ्या फेरीत ज्या जागा रिक्त राहतील त्यांच्यासाठी १६ ते २० ऑगस्ट या काळात तिसऱ्या फेरीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यासाठी १६ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता यादी जाहीर होईल.

बातम्या आणखी आहेत...