आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांची समस्या:नाहाटा चौफुलीवरील पथदिवे‎ दिवसाही सुरू, उधळपट्टी जैसे थे‎

भुसावळ‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील‎ सुभाष गॅरेज, नाहाटा चौफुली ते‎ रेल्वे उड्डाणपूल परिसरातील पथदिवे‎ गेल्या दोन दिवसांपासून २४ तास‎ सुरु आहेत. यामुळे विजेची नासाडी‎ होत आहे. दुसरीकडे सर्व्हिस‎ रोडवरील अनेक दिवे बंद असल्याने‎ पादचाऱ्यांना त्रास होतो.‎ शहरातून गेलेल्या राष्ट्रीय‎ महामार्गावरील पथदिव्यांची समस्या‎ वाढली आहे. महामार्गावरील‎ पथदिवे सकाळी लवकर बंद केले‎ जातात. तर सायंकाळी उशिराने सुरु‎ होतात. ही बाब नित्याची आहे. मात्र,‎ गेल्या तीन ते चार दिवसांपासून‎ नाहाटा चौफुली, सुभाष गॅरेज, रेल्वे‎ उड्डाणपुलादरम्यानचे दिवे सलग २४‎ तास सुरू आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...