आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथच्या पार्श्वभूमीवर रेल्वे डबे व इंजिनांचे उत्तर मध्य रेल्वेत मोठे नुकसान झाले. ही स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाने सोमवारी तीन गाड्या रद्द केल्या. दरम्यान, सोमवारी भारत बंदची हाक दिल्याने रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोमवारी आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांनी जंक्शन वरील कुली, विक्रेते, स्टॉलधारक, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, पार्कीग चालकांची बैठक घेतली. स्थानकावर पोलिस, आरपीएफचा रुट मार्च करण्यात आले. बंदचा कोणताही परिणाम शहरात झाला नाही.
अग्निपथच्या पार्श्वभूमीवर उत्तर मध्य रेल्वेच्या माणिकपूर, दानापूर भागात रेल्वे गाड्यांची तोडफोड, जाळपोळ झाली. यामुळे वेळापत्रक विस्कळीत होऊन चार दिवसांपासून गाड्या रद्द करणे सुरू आहे. शुक्रवारी तीन, शनिवारी चार, रविवारी १४ आणि सोमवारी देखील तीन गाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. तूर्त उत्तर भारतात आंदोलन पाहता भुसावळ जंक्शनसह विभागातील रावेर, सावदा, बऱ्हाणपूर, खांडवा, जळगाव, चाळीसगाव, नाशिक, अकोला, अमरावती आदी स्थानकांवर पोलिस व आरपीएफची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्व स्थानकांवर २४ तास गस्त, श्वान पथकाकडून तपासणी सुरू आहे. अतिरिक्त कुमक मागवल्याचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी सांगितले. सोमवारी पोलिसांनी रेल्वे स्थानक व परिसर, आऊटर, सर्व प्लॅटफॉर्मवर पथसंचलन केले.
सलग चौथ्या दिवशी गाड्या रद्दमुळे प्रवासी त्रासले रेल्वे प्रशासनाने सोमवारी पवन एक्स्प्रेस, एलटीटी-रक्सोल अंत्योदय एक्स्प्रेस, एलटीटी-पटना एक्स्प्रेस या गाड्या रद्द केल्या. मंगळवारी देखील काही गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ११ ते १२ या वेळात लोहमार्ग पोलिसांनी भुसावळ रेल्वे स्थानकावरील कुली, विक्रेते, खाद्यपदार्थ स्टॉलधारक, रिक्षा चालक व पार्किंग व्यावसायिकांची बैठक घेतली. लोहमार्ग पोलिस निरीक्षक विजय घेरडे, आरपीएफ निरीक्षक दयानंद यांनी संशयास्पद व्यक्तीची माहिती देण्याचे आवाहन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.