आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:विद्यार्थिनींनी जाणून घेतली पोलिस‎ ठाण्याच्या कामकाजाची माहिती‎

यावल‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आत्मनिर्भर युवती कार्यशाळा उपक्रमांतर्गत यावल‎ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पोलिस ठाण्यात‎ भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.‎ यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयात आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत‎ कार्यशाळा सुरू आहे. त्यात सहभागी ४०‎ विद्यार्थिनींनी क्षेत्रभेट अंतर्गत यावल पोलिस‎ ठाण्याच्या कामकाजाची माहिती घेतली.

ठाणे‎ अंमलदारासह विविध कामकाज कसे चालते?‎ कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी काय खबरदारी‎ घ्यावी लागते, वेगवेगळ्या कलमांबद्दलची माहिती‎ उपनिरीक्षक अविनाश दहिफळे यांनी दिली.‎ विद्यार्थिनींनी उपस्थित केलेले प्रश्न व शंकांचे‎ निरसन केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ.‎ सुधीर कापडे, प्रा.डॉ.अनिल पाटील, प्रा.वैशाली‎ कोष्टी, प्रा.भारती सोनवणे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...