आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:दुचाकीवरून पडल्याने डोक्यास मार‎ लागलेल्या युवकाचा अोढवला मृत्यू‎; 12 तास मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी‎

जळगाव‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरुन पडल्याने डोक्याला‎ मार लागलेल्या तरुणाचा सोमवारी‎ सकाळी ६.३० वाजता मृत्यू झाला.‎ या तरुणाने १२‎ तास मृत्यूशी‎ ‎ झुंझ दिली.‎ रविवारी‎ सायंकाळी सहा‎ वाजता सोयगाव‎ (जि.‎ औरंगाबाद) येथे तरुणाचा अपघात‎ झाला होता. फरीद जमाल तडवी‎ (वय ३७, रा. बहुलखेडा, ता.‎ सोयगाव, जि. औरंगाबाद) असे‎ मृत तरुणाचे नाव आहे.‎ हातमजुरी करुन फरीद कुटुंबाचा‎ उदरनिर्वाह करीत होता. रविवारी‎ सायंकाळी कामाच्या निमित्ताने तो‎ दुचाकीने सोयगावजवळ आला‎ होता.

एका पुलावरुन जाताना त्याची‎ दुचाकी घसरून तो कोसळला.‎ नागरीकांनी त्याला सुरूवातीला‎ साेयगाव येथील रुग्णालयात दाखल‎ केले. दुखापत जास्त असल्याने‎ डॉक्टरांनी जळगावात हलवण्याचा‎ सल्ला दिला. यानंतर शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयात दाखल केले. मध्यरात्री‎ तीन वाजता प्रकृती बिघडल्याने‎ त्याला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय‎ महाविद्यालय व रुग्णालयात दाखल‎ केले. उपचार सुरू असताना‎ सोमवारी सकाळी ६.३० वाजता‎ त्याची प्राणज्योत मालावली.‎ वेगवेगळ्या तीन रुग्णालयांत उपचार‎ करुन देखील फरीदचा मृत्यू झाला.‎ अतिरक्तस्त्राव व रक्तदाब‎ वाढल्याने त्याची प्रकृती खालावली‎ होती. त्याने १२ तास मृत्यूशी झुंज‎ दिली. सोमवारी सकाळी ११ वाजता‎ शवविच्छेदन करुन मृतदेह‎ कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.‎ अकस्मात मृत्यूची नोंद झाली.‎

सात मुलांचे छत्र हरपले‎ काही वर्षांपूर्वी फरीदच्या वडीलांचे निधन झाले आहे. यानंतर आई, पत्नी,‎ चार मुली व तीन मुले या सर्वांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी फरीदवर होती.‎ हातमजुरी करुन तो कुटुंब चालवत होता. या दुर्देवी अपघातामुळे कुटुंबीयांना‎ जबर धक्का बसला. त्याच्या सात मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले‎ आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...