आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:दुचाकीच्या डिक्कीतून‎ तीन‎ मोबाइल चोरणाऱ्या‎ संशयितास अखेर अटक‎

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीच्या डिकीतून‎ ३८ हजार ५०० रुपये किमतीचे तीन‎ मोबाईल लांबवल्याची घटना‎ फिल्टर हाऊसजवळ घडली होती.‎ या प्रकरणी एकाविरोधात भुसावळ‎ शहर पोलिसांत गुन्हा दाखल होता.‎ याप्रकरणी विकास गोरखा‎ (कवाडेनगर, भुसावळ) याला‎ अटक करण्यात आली. सूरज‎ शशिकांत नरवाडे (वय २०,‎ पांडुरंगनाथ नगर, गोकुळ नगर, पूजा‎ कॉम्प्लेक्सजवळ, भुसावळ) यांनी‎ तक्रार दिली होती. तपास नाईक‎ जाकीर मन्सुरी करत आहेत.‎ संशयिताकडून आणखी काही‎ गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता‎ आहे. त्या दृष्टीने पोलिस तपास‎ करत आहेत. आणखी कोणत्या‎ गुन्ह्यांमध्ये या संशयिताचा समावेश‎ आहे, याची माहिती तपासात‎ काढली जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...