आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विद्यमान तिन्ही जिल्हा परिषद सदस्य, माजी दोन्ही सदस्यांसह जुन्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जवळपास ४५ मिनिटे घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच आमदार किशोर पाटील लवकरच परत तेथील आणि मूळ शिवसेतेतच राहतील, अशी खात्री पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. पाचोरा तालुक्यात पाच पैकी तीन जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे आहेत. यात नगरदेवळा, बाळद गट या शिवसेनेच्या बालेकिल्ला असलेल्या गटातील जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, बांबरुड-कुरंगी गटाचे सदस्य पद्मसिंग पाटील, लोहारा-कुऱ्हाड गटाचे सदस्य दीपकसिंग राजपूत, पिंपळगाव -शिंदाड गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, बांबरुड- कुरंगी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य राजेंद्र साळुंखे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, माजी शहरप्रमुख भरत खंडेलवाल, पप्पू राजपूत, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, अजय पाटील, आनंदा माळी, अरुण तांबे, शिवाजी परदेशी, बंडू मोरे, विनोद गवळी, संतोष कुमावत, देवा सोनार आदींनी आमदारांना परत येण्याचे आवाहन केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.