आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे आगमन:सातपुड्यात मुसळधार, मनुदेवीचा धबधबा ओसंडला; किनगावात घरावर पडली वीज

यावल22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल तालुक्याच्या पश्चिम भागात सातपुड्याच्या कुशीत रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. यामुळे श्रीक्षेत्र मनुदेवी येथील धबधबा देखील ओसांडून कोठवाय नदीला पहिलाच पूर आला. पहिल्याच पावसात कित्येक वर्षानंतर प्रथमच धबधबा प्रवाहित झाला. दुसरीकडे किनगाव येथे बांधकाम सुरू असलेल्या एका घरावर वीज कोसळली. त्यात घराचे किरकोळ नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही काहीही इजा झाली नाही.

यावल तालुक्यातील पश्चिम भागामध्ये रविवारी चांगला पाऊस झाला. त्यात सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी परिसरात पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे मनुदेवी मंदिराच्या परिसरात असलेला धबधबा ओसांडून वाहण्यास सुुरुवात झाली. काही वेळातच कोठवाय नदीला पूर आला. दरम्यान, कित्येक वर्षानंतर केवळ जून महिन्यातील पहिल्याच पावसात मनुदेवीचा धबधब्या ओसांडून वाहत असल्याची घटना घडल्याचे जाणकारांनी सांगितले. तर किनगाव गावात तेजस दीपक लांडगे यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरावर वीज कोसळून किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले. पाऊस सुरू असल्याने काम बंद होते व सुदैवाने कुणाला इजा झाली नाही.

वादळाच्या तडाख्यामुळे जाडगाव, मन्यारखेड्यात 12 घरांचे नुकसान भुसावळ तालुक्यातील जाडगाव, मन्यारखेडा परिसराला शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. त्यात झाड पडल्याने जाडगाव व मन्यारखेडा येथे १२ घरे आणि एका रिक्षाचे नुकसान झाले. शिवाय वीज तारा तुटल्याने शनिवारपासून दुपारी ४ वाजेपासून वीजपुरवठा खंडित आहे. महसूल विभागाने पडझड झालेल्या घरांची पाहणी करून सुमारे ५ लाख रूपये नुकसानीचे पंचनामे केले.

जाडगाव येथे सुमित्रा उखर्डू तायडे, धांगो ओंकार तायडे, किसन संतोष चव्हाण, नथू निंबाळकर, विमल पाटील, आशा पाटील, गजानन कोळी, मुकुंदा सोनवणे, बाळू सोनवणे, दिलीप प्रभाकर सोनवणे, प्रमोद पाटील यांच्या घरांचे नुकसान झाले. मन्यारखेडा येथे देखील वादळाने सदाशिव कोंडू बाबर यांच्या घरांवर पिंपळाचे झाड पडून नुकसान झाले. विजय भास्कर जमदाळे यांच्या रिक्षावर झाडाची फांदी पडून नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी टळली.

बातम्या आणखी आहेत...