आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भुसावळ शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या भिंती पिचकाऱ्यांनी विद्रूप; पण एकही कारवाई नाही

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात गुटखाबंदी आहे. यासोबतच शासकीय कार्यालयांत धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा खाण्यास मनाई आहे. असे असूनही शहरातील शासकीय कार्यालयांच्या भिंती मात्र पिचकाऱ्यांनी विद्रूप झालेल्या आहेत. तहसील, प्रांताधिकारी कार्यालय, पंचायत समिती, पोलिस ठाणेदेखील यास अपवाद नाहीत. शासकीय कार्यालयाच्या आवारात धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे नियम आहेत. मात्र, असे असले तरी शहरात आतापर्यंत एकाही कार्यालयात धूम्रपान करणाऱ्याला दंड झालेला नाही. विशेष म्हणजे भुसावळ तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन ३० जून २०१६ रोजी झाले. पुढील महिन्यात या इमारतीला सहा वर्षे पूर्ण हाेतील. मात्र, अल्पावधीत या इमारतीला अवकळा आली. ठिकठिकाणी तूट-फूट होण्यासह इमारतीच्या दर्शनी भागातील भिंती, कोपरे, शौचालये गुटखा, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. प्रांत कार्यालय, पंचायत समिती, विविध पोलिस ठाणे, बीएसएनएस, डीआरएम कार्यालय, रेल्वेची विविध कार्यालय, स्थानक परिसर, पालिकेची व्यापारी संकुले, सार्वजनिक शौचालये, मुताऱ्यांमध्ये देखील अतिशय किळसवाणे चित्र पाहण्यास मिळत आहे.

प्रश्न : तहसील कार्यालयाच्या भिंती, कोपरे पिचकाऱ्यांनी रंगले आहेत. कारवाई का नाही? उत्तर : कार्यालयात धूम्रपान बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे नियमित कारवाई होईल. प्रश्न : मुतारीत पाणी नसल्याचे सांगितले जाते. पण, टेरेसवरील टाक्या तर भरलेल्या आहेत? उत्तर : याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना लगेच सूचना देण्यात येतील. प्रश्न : तहसील कार्यालयात स्वच्छता राहावी यासाठी नियोजन काय? उत्तर : स्वच्छतेसाठी कार्यालयातील प्रसाधनगृहे, टेरेसवरील पाण्याच्या टाक्यांची पाहणी करू. प्रश्न : कार्यालयातील काही कर्मचारी गुटखा खातात, त्यांचे काय ? उत्तर : सर्व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना करू. नंतर थेट दंडात्मक कारवाई होईल.

बातम्या आणखी आहेत...