आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीटभट्टी धारकांनी महर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीकडे जाणारे नळ कनेक्शन मध्येच तोडून टाकले आहे. यामुळे आवश्यक विधीसाठी स्मशानभूमीत पाणी नसते. शनिवारी देखील अंत्ययात्रेत असा अनुभव आल्याने नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.
शहरातील बडगुजर गल्लीतील रहिवासी जानुसिंग जोहरी यांचे निधन झाले होते. शनिवारी सकाळी ११.३० वाजता त्यांची प्रेतयात्रा श्री महर्षी व्यास मंदिराजवळील स्मशानभूमीत आली. याठिकाणी आवश्यक विधीसाठी पाणी लागते. हे पाणी घेण्यासाठी नातेवाइक स्मशानभूमीत पालिकेने बसवलेल्या नळावर गेले. मात्र, या नळाला पाणी येत नव्हते. यामुळे गैरसोय झाल्याने अंत्यविधीसाठी आलेल्यांना पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. वास्तविक या नळाला २४ तास पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे. शनिवारी मात्र पाणी नव्हते.
दरम्यान, पालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी हे देखील स्मशानभूमीत उपस्थित होते. त्यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख दादू धोत्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवून पाहणी केल्यावर पाइपलाइन नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले. काही वीटभट्टी चालकांनी पाइपलाइन मध्येच बंद करून पाणी वापर सुरू केला. यामुळे स्मशानभूमी पाणीपुरवठा होत नव्हता असे धोत्रे यांनी सांगितले. मात्र, ही समस्या लवकरच सुटेल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. तेव्हा कुठे लोकांचे समाधान झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.